You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त १०४ शिक्षकांना मिळणार वेतन वाढीचा लाभ

सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त १०४ शिक्षकांना मिळणार वेतन वाढीचा लाभ

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन 2006पासून ते 4 सप्टेंबर 2018 पूर्वी जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्या 104 आहे. 1जुलै 2022 च्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार वरील कालावधीतील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतन वाढ देण्यासंदर्भातच्या शासन निर्णयाची सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेने कार्यवाही सुरु केली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 104 जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतन वाढ मिळण्यासंदर्भात 25 जुलै 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर साहेब यांच्याकडे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे , जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा लढा मंच यांनी लेखी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती .तद्नंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.महेश धोत्रे साहेब यांनी हा प्रश्न सप्टेंबर 2022 अखेर पर्यंत पूर्तता करून सोडविला जाईल असे सांगितले होते .त्याला अनुसरून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी -डोईफोडे व दत्ता गायकवाड यांचे विशेष सहकार्यातून जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ मिळण्यासंदर्भात आवश्यक व योग्य ती कार्यवाही सुरु झालेली आहे . 27 सप्टेंबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सन 2006 पासून4 सप्टेंबर 2018 पूर्वीच्या जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी पडताळणी करिता पाठविलेले आहे .मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग -प्रजित नायर साहेब,शिक्षणाधिकारी प्राथमिक महेश धोत्रे साहेब,उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रामचंद्र आंगणे, शोभराज शेर्लेकर, कक्षअधिकारी -डोईफोडे ,दत्ता गायकवाड यांचे सहकार्य व माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न सर्वप्रथम सुटत असल्याबद्दल राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी समाधान व्यक्त केलेले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा