You are currently viewing कणकवली विधानसभा मतदारसंघात ५ कोटींची विकास कामे मंजूर – आ.नितेश राणे यांचे प्रयत्न

कणकवली विधानसभा मतदारसंघात ५ कोटींची विकास कामे मंजूर – आ.नितेश राणे यांचे प्रयत्न

७८ कामांसाठी ५ कोटी रूपयांचा दिला निधी

कणकवली

कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नविन सरकारने ५ कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजूरी दिलेली आहे . कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली , देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील ग्रामिण भागातील विकासकामांसाठी राज्यात सत्ता बदल झाल्यावर माझ्या पाठपुराव्यामुळे झाल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

शिंदे – फडणवीस सरकारने ७८ कामांसाठी ५ कोटी रूपयांचा निधी दिनांक २२ सप्टेंबर २०२२ च्या शासकीय आदेशानुसार ( २५१५ ) ग्रामिण भागातील मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या कामांसाठी मंजूर करण्याचे आदेश कार्यासन अधिकारी श्री . अभिजित तेलवेकर यानी काढले आहेत . सदरहू कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावयाचे आहेत . शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे ग्रामिण भागातील रखडलेल्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यात सुरूवात झाली आहे . आमदार नितेश राणे हे निवडून आल्यापासून सतत विरोधी पक्षात असल्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे रखडली होती , परंतु आता नविन सरकार आल्यामुळे जोरदारपणे विकासकामे मार्गी लागणार असून यापुढेही मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी मंजूर करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याने नागरीकांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा