You are currently viewing तोर्सेत मासळीवाहू कंटेनरची कारला धडक

तोर्सेत मासळीवाहू कंटेनरची कारला धडक

कारमधील महिलेसह चिमुकल्याचा जागीच दूर्दैर्वी मृत्यू; अन्य तिघे गंभीर : बांबूळीत हलवले

बांदा

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोर्से (पेडणे-गोवा) येथे आज दुपारी मोटार व मासळीवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील गुंडेशा कुटुंबातील महिला व तिच्या एक वर्षाचा चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मोटारितील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान , खराब रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच आज अपघात होऊन माय लेकराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पुणे येथील पियुष गुंडेशा हे पत्नी अपूर्वा (वय ३२), दीड वर्षाचा मुलगा, सात वर्षांची मुलगी व घरकाम करणाऱ्या महिलेसह (एमएच १२ टीएस ८७८०) या क्रमांकाच्या मोटारीने गोव्यात पर्यटनासाठी जात होते. मुंबईच्या दिशेने मासळी वाहतूक करणारा कंटेनरने (केएल १० – एझेड ८०९६) मोटारीला समोरासमोर जोरदार टक्कर दिली. या अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला. यामध्ये आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा