कणकवली:
आज दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी १०:४५ च्या दरम्यान ओसरगाव डंगळवाडी येथे महामार्गावर दूभाजकाला आदळून अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की चालकाचा हाताचे हाड तुटून लोंबकळत होता. अपघात होताच महामार्गावर वाहतूक करणार्यांनी मदत कार्य सुरू केले. मात्र अपघात ग्रस्त आपले नाव, पत्ता लपवत होता. फोनाफोनी करून अखेर त्याच्या घरापर्यंत कळवले आणि कणकवली रूग्णालयात दाखल केले. जमलेल्या सर्वांनी बघ्यांची भूमिका न घेता आपापल्या परीने मदतकार्य सुरू करून अपघात ग्रस्त प्रतिकराज प्रमोद नारकर राहणार कोकीसरे वैभववाडी याला रूग्णालयात दाखल केले त्याबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांनी सर्वांचे आभार मानले.
आपल्या पाल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल किंवा तो सुज्ञ नसेल तर त्याला वाहन देवू नका… वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष यांची पालकांना विनंती.