You are currently viewing गायींच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन आटोक्यात येते?…..!!!!!

गायींच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन आटोक्यात येते?…..!!!!!

 

 

गायीच्या शेणापासून निर्मीत चिप नियंत्रणात आणणार मोबाईल रेडिएशन…

 

गौमूत्र आणि शेणाचे अनेक फायदे अनेकांना माहितीच आहे. पण, गायीच्या शेणापासून आता चक्क अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे. ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे. कामधेनू आयोगाने गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे. गायीचे शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गायीचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे, असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.

मोबाईलमध्ये ठेवल्यास रेडिएशन होते कमी

कथीरिया म्हणाले, गायीच्या शेणापासून रेडिएशन कमी करण्यास मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. आम्हाला असे दिसून आले आहे, ही चिप मोबाईलमध्ये ठेवल्यास रेडिएशन कमी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा