वेंगुर्ला
भविष्यात सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी आणि सर्व पर्यटन व्यावसायिकांना एकत्र आणून समान व्यासपिठावर काम करण्याचा प्र्रयत्न सिधुदुर्ग पर्यटन व्यावसायीक महासंघ करणार आहे. याच अनुशंगाने २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत वेंगुर्ला येथील साई दरबार हॉल येथे जागतिक पर्यटन दिन आयोजित केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री रविद्र चव्हाण, पर्यटन मंत्री मंगलप्रसाद लोढा, पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या मार्गदर्शक निलाताई लाड, भारत पर्यटन मंत्रालय पश्चिम विभाग मुंबईच्या सहसंचालक भावनाताई शिदे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय कदम, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, महाराष्ट्र पर्यटन संचानालय कोकण विभागचे प्रशांत वाणी, खादी ग्रामोद्योगचे आनंद कर्णिक, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी विजय वर्मा, प्रादेशिक बंदर अधिकारी सिधुदुर्ग कॅप्टन संदीप भुजबळ, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगांवकर यांच्यासह पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कोकण विभाग व सिधुदुर्गचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.