सिंधुदुर्ग :
कुडाळ, मालवण आणि वैभववाडी या तीन तालुक्यातील शिवसेना – ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना – शिंदे गटात आज प्रवेश करते झाले. या प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुडाळ, मालवण आणि वैभववाडी या तीन तालुक्यातील ठाकरे गटातील शिवसैनिक आहेत. कुडाळ घावनाळे मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य अनुप्रिया खोचरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला फार मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित होते.
घावनाळे जिल्हा परिषद सदस्य अनुप्रिया खोचरे यांच्या सह अनिल खोचरे, महिला शाखाप्रमुख भक्ती खोचरे, गौरव नावरेकर, अमेय खोचरे यांच्या सह शिवसेनिकांनी प्रवेश केला. तर मालवण तालुका हडी येथील शिवसेना शाखा प्रमुख राजा तोंडवळकर यांच्यासह भारती धारकर, शेखर तोडणकर, विकास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वैभववाडी तालुक्यातून विश्राम रावराणे आणि नंदू रावराणे यांनी प्रवेश केला. या प्रवेशावेळी बबन शिंदे, संजय आंग्रे, भूषण परूळेकर संदेश पटेल, भास्कर राणे आदी उपस्थित होते.