वेंगुर्ला :
कोरोना महामारीने भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. कोरोनामुळे सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लागू केले होते, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या 3 टप्प्यांनंतर सरकारने काही प्रमाणात दिलासा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्यवसाय, उद्योग पुन्हा रुळावर आणण्याची सर्वात मोठी अडचण होती. लॉकडाऊनमध्ये जिथे लोकांची बचत संपली, तिथे पगार न देणे, उत्पादन न होणे, माल न विकणे यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवसाय आणि वाणिज्य व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत पॅकेज (रु. 20 लाख कोटी) जाहीर केले. यासोबतच त्यांनी लोकांना विनंती केली की, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी “स्थानिक वस्तू” जास्त खरेदी करा. जेणेकरून छोट्या उद्योजकांना फायदा होईल आणि देशाचा पैसा देशातच राहील. तसेच लोकांना “वोकल फॉर लोकल” बनण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांच्या या आवाहनाला साथ देत महिला मोर्चाच्या पदाधिकारयांनी वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ गावातील सावंत – भोसले यांच्या पाॅवरलुम ला भेट देत, त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या.
यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर, कुडाळ महिला अध्यक्षा मुक्ती परब, वेंगुर्ले महिला ता. सरचिटणीस वृंदा गवडंळकर, वेंगुर्ले महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, माजी नगरसेवीका प्रज्ञा राणे , रेखा काणेकर, आदिती सावंत, आकांक्षा परब, रसीका मठकर, वृंदा मोर्डेकर, हसीनाबेन मकानदार, शुभांगी सावंत – भोसले व बाबु भोसले उपस्थित होते.