कुडाळ
शुक्रवार दि. 23 l 9 | 2022 रोजी जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे *राष्ट्रीय पोषण माह* या उपक्रमा अंतर्गत *सही पोषण देश रोशन* हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला.
या उपक्रमासाठी खास पालकांसाठी पाककला स्पर्धा ठेवण्यात आली होती. उस्फूर्तपणे सर्व पालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. काही मुलांनीही पालकांना पदार्थ बनवण्यासाठी मदत केली. खूप आकर्षक पद्धतीने फुले a रांगोळ्यानी सजावट करून या पदार्थांची मांडणी केली. सजावटीच्या कामात *पदवीधर शिक्षक श्री परुळेकर सर* यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले.
*उपशिक्षक श्रीम महानंदा चव्हाण*
व *पदवीधर शिक्षक श्री अमीर सातार्डेकर सर* यांनी फलकलेखन, घोषवाक्य लेखन, व पदार्थाच्या नावाच्या पट्टया तयार केल्या. अंगणवाडी सेविका *सौ. दिपा फोंडके* व पोषण आहार शिजवून देणाऱ्या काकी सौ शर्मिला वायंगणकर व श्रीम नेहा वायंगणकर यांचेही या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
*मुख्याध्यापक श्रीम. मानसी सुबोध सावंत* यांनी सर्वांचे स्वागत केले. व प्रास्ताविक केले. त्यांनी या उपक्रमाविषयी माहिती पालकांना दिली. उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला.
प्रथम पोषक आहार प्रतिज्ञा घेण्यात आली. नंतर सर्वांचे खास आकर्षण ठरणारी, शिक्षकांच्या कल्पकतेतून सजलेली पोषण परी या कार्यक्रमात उपस्थित होती. या छोट्या परीवर स्वरचित बालगीत श्रीम सावंत मॅडमनी सादर केले. तसेच पोषक आहाराचे महत्त्व सांगणारी कविता *उपशिक्षक श्रीम मसुरकर मॅडम* यांनी सादर .
सर्वात शेवटी या सर्व पदार्थांचा मनमुराद आस्वाद सर्व विद्यार्थी शिक्षक पालकांनी घेतला.