You are currently viewing तुळशीवृंदावन

तुळशीवृंदावन

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*तुळशीवृंदावन….*

माझ्या माहेरी कोकणात अंगणात तुळस दिमाखात उभी असते.. रोज संध्याकाळी दिवा लावणं, शुभंकरोती , तुळशीचे लग्न आजही न चुकता सगळ्या गोष्टी केल्या जातात..
लहानपणापासून माझ्यावर हे संस्कार झाल्याने मलाही घराला अंगण मिळाले आणि तेही पुण्यात.. गेली १८ वर्षे माझ्याही अंगणात तुळस दिमाखात उभी आहे.. कारण ती माझी सखी आहे.. मी घरात नसताना माझ्या घराची काळजी ती घेते.. कुठल्याही बाहेरच्या वाईट प्रवृत्तीला किवा व्यक्तीला ती गेटच्या आत येउ देत नाही .. तुम्ही हा अनुभव घेउन पहा.. ते फक्त रोपटं नसतं तर त्यात विष्णु लक्ष्मीचा वास असतो.. गार्डन रीन्युएशनमुळे काल एक नवीन वृंदावन आणलं आहे..
काल एक सखी माझ्याकडे आली होती तिने ते वृंदावन पाहिलं आणि मला म्हणाली , सोनल किती old faahion आहे गं ?? .. म्हटलं काय झालं गं त्यावर ती म्हणाली , आता कोणाच्या दारात तुळस असते का ?? .. त्या तिच्या वाक्यावर मी चक्रावले.. तुळस दारात असणं ही old fashion असेल तर संध्याकाळी तीन्ही सांजेला ग्लासला ग्लास लावत चीअर्स म्हणणं ही New fashion आहे का ??.. २०१९ ला मी लंडनला होते तेव्हा तिथे एका फॉरेनरच्या घराबाहेर मी तुळशीचे रोप पाहिले होते.. त्यांनाही या गोष्टीचे महत्व पटत आहे.. त्यांनाही योगाचं महत्व समजलय त्यांनाही हळद , कारलं याचे उपयोग समजले आहेत.. तिकडुन कुठलीही गोष्ट आली की आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या चांगल्या गोष्टी सोडुन देतो फक्त आणि फक्त मॉडर्न या शब्दाखाली.. घरात बोलला जाणारा प्रत्येक शब्द , मंत्र हा आपल्या अवयवावर सकारात्मकतेने काम करतो.. आपले विचारच आपलं घर आणि घरातील माणसे यांना घडवतात.. आणि खुप महत्वाची गोष्ट तुळस ही प्रत्येकाकडे येत नाही.. जिथे उच्च विचार , दुसऱ्याबद्दल करुणा ,दया , माया , प्राण्यांबदल प्रेम असते तिथेच ती बहरते.. खुप जणानी मला सांगितले आमच्याकडे तुळस टिकत नाही.. याची हिच कारणे आहेत… मॉडर्न असणं म्हणजे विचारानी उच्च असणं चांगल्या गोष्टी सोडुन नव्हे..ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी धुप पेटवा त्याने घरातील जंतु मरतात , मंत्रोच्चाराने भाषाही शुद्ध होते आणि मुलांच्या कानावर चांगल्या गोष्टी जातात.. घरात चप्पल घालुन हिंडणे त्यामुळेही घरात जंतुसंसर्ग होतो म्हणुन चप्पला बाहेर काढाव्यात.. छोट्या गोष्टी आयुष्यात खुप मोठा सकारात्मक बदल घडवतात…जुन्या नव्याची सांगड घालता यायलाच हवी ना..
नव्याने विचार करुन पहा…
सोच बदलो
देश बदलेगा….

सोनल गोडबोले.
लेखिका,अभिनेत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा