You are currently viewing गणित संबोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे सुयश

गणित संबोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे सुयश

बांदा

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने आगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांची प्रावीण्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.

दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा तीन टप्यात परीक्षांचे आयोजन केले जाते.चालू वर्षी संपन्न झालेल्या परीक्षेत बांदा शाळेतून 22विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते यामध्ये युवराज नाईक,पूर्वा मोर्ये ,शिवानंद परब यांनी प्रत्येकी 96 गुण मिळवत शाळा पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला तर सोहम निंबाळकरने 92 गुण मिळवत द्वितीय ,आदित्य ठाकूर , वेद परब व काजल लमाणी यांनी 84गुण मिळवत तृतीय , आसिक बांगी याने 82 गुण मिळवत चौथा तर चिन्मयी रूबजी व नैतिक मोरजकर यांनी 80गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला .याचबरोबर मंथन सावंत,आदिती सावंत,अनुष्का झोरे,प्रणव डावखुरे , तनुज कदम, संयुक्ता वायंगणकर,दिव्या तरटे,युतिका बांदेकर, महमद खान, हलिमा खान, गौरेश गावडे हे विद्यार्थी विशेष श्रेणीत उतीर्ण झाले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर वर्गशिक्षिका सरोज नाईक, प्रशांत पवार,उर्मिला मोर्ये,जागृती धुरी,रसिका मालवणकर, सावंत ,रंगनाथ परब, जे.डी.पाटील, वंदना शितोळे, गोपाळ साबळे यांचे शितल गवस लाभले. या विद्यार्थ्यांना विस्तार अथिकारी दुर्वा साळगावकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,उपाध्यक्ष श्रदा नार्वेकर,सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा