पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा च्या निमित्ताने भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आयोजन
वेंगुर्लेतील भाजपाच्या आदर्शवत पक्ष संघटनेची दखल महाराष्ट्रात निच्छितच घेतली जाईल – विशाल परब
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा नंबर वन बनवुन तळकोकणातुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना बळ देऊया – विशाल परब
वेंगुर्ले
वेंगुर्ल्यातील भाजपच्या संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे वागणे आणी बोलणे ऐवढ शांत आणी विनयशील आहे.त्यांची हिच पद्धत आपल्याला आवडते.त्यामुळे पक्षवाढीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.ह्याच पद्धतीने आपण काम केले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नंबर वन बनून सत्तेची सर्व केंद्रे आपल्याला भाजपच्या हातात येतील.यासाठी आपण आजच निर्धार करून तळकोकणातून भाजपची वज्रमूठ बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात ताकद देवूया.हीच खरी नरेंद्र मोदींना वाढदिवसाची आपण दिलेली भेट असेल.असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते व उद्योजक विशाल परब यांनी वेंगुर्ल्यातील भाजपच्या कार्यक्रमात काढले. नरेंद्र मोदी यांच्या कार्य चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते वेंगुर्ले भाजपाच्या वतीने करण्यात आले.यावेळेस ते व्यासपीठावरून बोलत होते.
भारत मातेचे समर्पित सुपुत्र जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन वेंगुर्ले येथील नगरवाचनालय हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते झाले.राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे . यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे . या चित्र प्रदर्शनाचा जिल्ह्याचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यामधुन आज झाला. तसेच २१ व २२संष्टेबर ह्या दोन दिवशी हे चित्रप्रदर्शन नगरवाचनालय वेंगुर्ले येथे असणार आहे.या उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे युवा नेते विशाल परब,जिल्हा सरचिटणीस तथा ” सेवा पंधरवडा ” जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई आणि जिल्ह्याचे चित्र प्रदर्शन प्रमुख माजी नगराध्यक्ष राजन गीरप, प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते .
या कार्यक्रमाला नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर – साक्षी पेडणेकर – ईशा मोंडकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब , उपसरपंच हेमंत गावडे , ता.चिटणीस समीर चिंदरकर व नितीन चव्हाण , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , किसान मोर्चाचे प्रफुल्ल प्रभु व ज्ञानेश्वर केळजी , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस व हसीनाबेन मकानदार , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , युवा मोर्चाचे नारायण कुंभार – भुषण सारंग – उमेश कुंभार , डाॅ.दर्शेश पेठे , माजी सरपंच विजय रेडकर , व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे , रविंद्र शिरसाठ , सुनील वारंग , ओंकार चव्हाण , उल्हास तळवडेकर , संतोष खानोलकर , विनोद लोणे तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.