You are currently viewing मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२२ अंतिम फेरी मधे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२२ अंतिम फेरी मधे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामधे दिनांक १५सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या, विद्यार्थी कल्याण विभाग मुंबई चर्चगेट येथील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
१) वाद-विवाद स्पर्धा स्पर्धा :-१)प्रसन्न सोनुर्लेकर २)कामाक्षी महालकर
द्वितीय क्रमांक (रौप्यपदक )
२) शास्त्रीय संगीत गीत गायन स्पर्धा :-पल्लवी पिळणकर तृतीय क्रमांक (कांस्यपदक )
३) नाट्यसंगीत स्पर्धा :- समृद्धी सावंत
तृतीय क्रमांक (कांस्यपदक )
वादन साहाय्यक
हार्मोनियम :-मंगेश मेस्त्री
तबला:- ओंकार तळवणेकर
तबला :-ज्यास्मित पिळणकर
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले,युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे.तसेच स्वावलंबन कॅन्टिन चालक सुर्यकांत राऊळ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, देऊन कौतुक केले आहे.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एल. भारमल हे उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कला व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ डी जी बोर्डे , सह समन्वयक डॉ एस एम बुवा ,सदस्य प्रा एस ए देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा