*युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुका युवा मोर्चाचे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
कुडाळ :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संवरक्षण कॅबिनेट मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुडाळ तालुका आयोजित भव्य रक्तदान शिबिर पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. भाजपा नेते निलेश राणे म्हणाले, चव्हाण साहेबाच्या वाढदिवसानिमित्त फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी रायगडसह कोकणात विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत ,माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये चव्हाण साहेबांच मार्गदर्शन मोलाच आहे.आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सांगणारा एकमेव नेता म्हणजे रविंद्र चव्हाण साहेब,प्रत्येकाच्या जीवनामध्ये रवींद्र चव्हाण यांनी स्पर्श केलेला आहे. सगळ्यांना हवाहवासा माणूस म्हणजे आमचे रवींद्र चव्हाण साहेब, असे गौरवोद्गार भाजप नेते निलेश राणे यांनी काढले.तसेच सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिरास रक्तदात्यांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. युवा मोर्चाच्या अभिनव उपक्रमास सर्वांनी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे, जेष्ठ नेते राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, श्रीपाद उर्फ पप्या तवटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, तसेच नगरसेवक निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, कु. चांदणी कांबळी, सरचिटणीस देवेन सामंत,पिंगुळी अध्यक्ष अजय आकेरकर,सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, बाव सरपंच नागेश परब, माजी सरपंच पावशी संजय कोरगावकर, मंगेश चव्हाण, माजी नगरसेविका सौ प्रज्ञा राणे, कुडाळ उपाध्यक्ष मुक्ती परब, निखिल कांदळगावकर, विनोद सावंत, अवधूत सामंत, वृनाल कुंभार, स्वरूप वाळके, संतोष डीचोलकर, रामचंद्र परब, महेंद्र मेस्त्री, अजय डीचोलकर, दत्ता बांबर्डेकर, अमित दळवी,पावशी ग्रा.प सदस्य ऋणाल कुंभार, जयश चिंचलकर, ज्ञानेश सरनोबत, सुश्मित बांबुळकर, श्रावण शिरसाट सह अन्य युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.