You are currently viewing प्रवाहाच्या वाटेवरील दिपस्तंभ तुम्ही, सदैव मार्ग दाखविणारे गुरुजण तुम्ही- कु. साक्षी भोसले

प्रवाहाच्या वाटेवरील दिपस्तंभ तुम्ही, सदैव मार्ग दाखविणारे गुरुजण तुम्ही- कु. साक्षी भोसले

अर्जुन रावराणे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

वैभववाडी

५ सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवाच्या सुट्टीतील कालावधीमुळे शाळांमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला नाही. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


या प्रसंगी लीना रावराणे हिने मुख्याध्यापक तर चैतन्या पाटील हिने माध्यमिक विभाग प्रमुख म्हणून भुमिका उत्तम रितीने पार पाडली. तसेच साक्षी भोसले, प्रिया बोडेकर, दिक्षा ढेकणे, रागिणी कोळी, आर्या तांबे, श्रृती गुरव, दिव्या घवाळी, प्रतिक्षा कोकरे, श्रृती तांबे, श्रेयसी आंबेकर, हर्षदा गुडेकर, वैष्णवी नादकर, अंतरा जैतापकर, दुर्वांक चव्हाण, अनुजा पवार, कस्तुरी गुरव, सुयश गजोबार, वरद मेस्त्री, ध्रुवी साळुंखे, मंजश्री गावडे, राहुल बोडेकर, पियुष जाधव, मानसी चव्हाण, आर्यन क्षिरसागर, दिपराज झोरे, सलमा शेख, प्रिती पाटकर, ओंकार शिरकर, मुस्कान काझी, निशांत चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांची भूमिका पार पाडली.


प्रशालेची विद्यार्थीनी साक्षी भोसले या विद्यार्थीनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्यावेळी. ‘प्रवाहाच्या वाटेवरील दिपस्तंभ तुम्ही , सदैव मार्ग दाखविणारे गुरुजण तुम्ही, अशी भावना तिने व्यक्त केली. तर इयत्ता आठवी च्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावीच्या वर्गामार्फत प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आले. आर्या तांबे, लिना मांजरेकर या विद्यार्थ्यांनी आपला आजचा अनुभव कथन केला. प्रशालेचे क्रीडा शिक्षक तुळसणकर एस टी यांनी गुरुची महती सांगणारे गीत यावेळी सादर केले. जेष्ठ शिक्षक शिंदे सर यांनी ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू’ हे मातृगीत उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत सादर केले. प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर यांनी आपले मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने संबोधित केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, जेष्ठ शिक्षक एस.बी.शिंदे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.एस.चोरगे., क्रीडा शिक्षक एस. टी. तुळसणकर, बाह्य परीक्षा प्रमुख पी.बी.पवार तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा