संघर्षासाठी ग्रामस्थांना हाक
सावंतवाडी
मळेवाड शिरोडा दशक्रोशि मध्येमायनिंग प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून याला स्थानिकांचा विरोध दिसून येत आहे.
जेएसडब्ल्यू कंपनी कडून मळेवाड शिरोडा दशक्रोशि परिसरात आजगाव,धाकोरे,शिरोडा बांध,सोन्सुरे,आरवली,सखेलेखोल या गावात मायनिंग प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.यासाठी सदर गावात बोअरिंग चाचणी घेण्यासाठी ग्रामपंचायत कडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायत कडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.अद्याप पर्यंत एकाही ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिलेला नसून या भागातील ग्रामस्थ व शेतकरी यांच्याकडून या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यात येत आहे.यासंदर्भात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी ज्या गावांमध्ये मायनिंग प्रकल्प झाले त्या गावांची सद्यस्थिती आपण सर्वजण पाहतो आहोत.त्यामुळे ज्या गावांमध्ये मायनिंग प्रकल्प करण्यात साठी हालचाली सुरू करण्यात आलेले आहेत त्याला विरोध करणे गरजेचे असून मळेवाड गावात मायनिंग प्रकल्प नको हीच आपली भूमिका असून इतर गावातील लोकप्रतिनिधी शेतकरी व ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे येऊन याला कडाडून विरोध करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.