मसुरे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते गांधी जयंती अशा सेवा पंधरावड्याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांनी चिंदर पडेकाप येथील धनगर वस्तीला भेट दिली. तिथे बैठक घेऊन त्यांनी तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ज्या समस्या आहेत. त्या सुटणा-या असल्यास शासन दरबारी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे सांगितले.
नुकतेच भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुकाध्यक्ष पद स्विकारल्या नंतर बाळा गोसावी हे मालवण तालुक्यातील पंधरावाडी वस्त्यांवर त्यांनी भेट दिली आहे. या भेटीवेळी वाघोजी वरक, बाळकृष्ण वरक, भगवान वरक, लक्ष्मी वरक, लक्ष्मी खरात, बापूजी खरात, मंगेश वरक, दर्शन वरक,वाघोजी खरात, विजय खरात, बापूजी सिताराम खरात, अभिषेक खरात, जाऊ वरक, अभय खरात उपस्थित होते.
या बैठकीत भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका प्रतिनिधी म्हणून विश्वास खरात व संतोष वरक यांची निवड करण्यात आली. बैठकीचा समारोप विश्वास खरात यांनी केला.