You are currently viewing अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्धार्थ गजानन कुलकर्णी यांना मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय “सावित्रीबाई फुले समाजभूषण” पुरस्कार

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्धार्थ गजानन कुलकर्णी यांना मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय “सावित्रीबाई फुले समाजभूषण” पुरस्कार

 

आपल्या करियरची सुरुवात केवळ ध्वनिमुद्रक म्हणून केलेले लेखक, कवी, अभिनेते अशा विविध क्षेत्रात आपले नाव केलेले सिद्धार्थ गजानन कुलकर्णी, पुणे यांना महाराष्ट्र साहित्य मंडळाचा “सावित्रीबाई फुले समाजभूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. अलीकडे त्यांची मराठी साहित्य मंडळ, विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. दिलीप कुमार, देवानंद, राजकपूर पासून अगदी आजकालच्या टायगर श्रॉफ, आलिया भट पर्यंत चार पिढ्यांबरोबर चित्रपट सृष्टी मध्ये काम केलेले श्री.सिद्धार्थ कुलकर्णी म्हणजे अजब रसायन आहे. ध्वनिमुद्रक म्हणून चित्रपट सृष्टी मध्ये पाऊल ठेवलेले सिद्धार्थ कुलकर्णी यांनी पुढे संकलक, लेखक, असिस्टंट डायरेक्टर, डायरेक्टर, मॉडेल/आर्टिस्ट समन्वयक, पी.आर.ओ. संगीतकार, प्रसिद्धीप्रमुख, इव्हेंट मॅनेजर अशा बॉलीवूडमधील सर्व क्षेत्रात जवळपास 28 वर्षे काम केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र म्हणजे मराठी साहित्य मंडळ…! मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य मंडळांनी पुरस्कारासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांमधून मराठी साहित्य मंडळाच्या तज्ञ समितीने श्री. सिद्धार्थ गजानन कुलकर्णी यांची “सावित्रीबाई फुले समाजभूषण” पुरस्कारासाठी निवड केली आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी राज्य पातळीवरील हा पुरस्कार मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो. 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाने हा पुरस्कार शिवशंकर सभागृह, अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस, रामनगर वर्धा येथे वितरित केला जाणार आहे. असे मराठा साहित्य मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ कवयित्री नीलिमा जोशी आणि विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री.सिद्धार्थ कुलकर्णी यांना “सावित्रीबाई फुले समाजभूषण” पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा