जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
सिंधुदुर्गनगरी
मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. यात मडक्यातील पाणी पिल्याच्या रागातून तिसरीत शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याला उच्चजातीय शिक्षकाने मारहाण केल्याने त्याचा झालेला मृत्यू सह अनेक घटना अलिकडील काळात घडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा, या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून ‘जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा’ आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयार काढला.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या देशभरात घडत असलेल्याअनेक घटनांचा निषेध नोंदविला हा मोर्चा आजगुरुवारी १५ सप्टेंबरला सकाळी ११.३० वा. ओरोस फाटायेथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यामोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव सहभागी झाले होतेमोर्चेकऱ्यानी या घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली मोर्चेकरी सकाळी ११ वा. ओरोस येथील शिवपुतळ्याकडे एकत्रित आले तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पणकेला मोर्चेकऱ्यांना संबोधनकेले, सूचना दिल्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच केले.जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झालेपुढे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना सांगितली
यामध्येवंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर,कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सत्यशोधक संघटनेचे नेते ॲड.सुदीप कांबळे, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी चंद्रकांत पवार, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संजय तांबे, चर्मकार संघटनेचे महानंदा चव्हाण, कास्ट्राईबचे किशोर कदम आदी सहभागी झाले होते
यावेळी बोलताना महेश परुळेकर म्हणाले, मडक्यातील पाणी प्यायल्याने राजस्थानमधील इंद्रजीत या चर्मकार समाजातील आठ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली व त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभर निषेध होत आहे. गुजरातमधील गँगरेप प्रकरणातील आरोपींना सोडून देऊन त्यांचे खुलेआम स्वागत केले जात आहे. फी भरली नाही म्हणून उत्तरप्रदेशातील १३ वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. राजस्थान येथे १० जातीयवादी लोकांनी मिळून मागासवर्गीय शिक्षिकेला दिवसाढवळ्या रॉकेल ओतून पेटवून जाळून मारले. या अन्याय, अत्याचार, विषमतावादी जातीव्यवस्थेविरोधात संघटीतपणे लढा देण्याची गरज आहे.
जातीय अत्याचाराच्या घटना देशाप्रमाणे महाराष्ट्रात घडत असून सिंधुदुर्गातही अट्रोसिटी कायद्यांतर्गत घडणाऱ्या घटनांमुळे माणसांच्या मनात चिड निर्माण होत आहे. या अन्यायी, अत्याचारी नराधमांना शिक्षा व्हायला हवी. जातीयवादी घटनांविरोधात संविधानवादी, मानवतावादी दृष्टीकोन असणाऱ्यांनी संघटीतपणे लढा देणे गरजेचे आहे.
जातीय अत्याचाराच्या घटना देशहिताच्या दृष्टीने चिंता, काळजी, दुःख, वेदना, संताप, चिड निर्माण करणाऱ्या आहेत. देशाचे राष्ट्रीय ऐक्य आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्व मानवतावादी आणि मूल्याधिष्ठीत भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी मोर्चामध्ये संविधानवादी, मानवतावादी, पुरोगामी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.यावेळी बोलताना सुदीप कांबळे म्हणाले, समाजाची व्यवहारीक हतबलता आणि न्यायव्यवस्थेतील अनेक कारणांमुळे न्यायदान प्रक्रियेला विलंब होतो. त्यामुळे अन्यायी, अत्याचारी, नराधमांचे फावते. अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी क्रांतीकारकरित्या एकत्र आल्याचे दिसून आले.