You are currently viewing कणकवली शहर युवासेनेच्या वतीने पटवर्धन चौकात स्वाक्षरी मोहीम

कणकवली शहर युवासेनेच्या वतीने पटवर्धन चौकात स्वाक्षरी मोहीम

वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल शिंदे सरकारचा केला निषेध

स्वाक्षरी मोहीमेची कणकवली विधानसभा मतदारसंघात झाली सुरुवात

वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या शिंदे सरकारच्या निषेधार्थ आज कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली शहर युवासेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी निषेध असो, निषेध असो खोके सरकराचा निषेध असो, शिवसेना जिंदाबाद, ५० खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, ४० गद्दारांचा निषेध असो अशा घोषणांनी शिवसैनिक व युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला.


यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, उपतालुकाप्रमुख महेश कोदे,उपशहरप्रमुख वैभव मालंडकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले, कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, तात्या निकम,रुपेश आमडोसकर, सिद्धेश राणे, तेजस राणे, बबन मुणगेकर, समीर मुणगेकर, आबू मेस्त्री, ईमाम नावळेकर, उत्तम लोके,किरण वर्दम, दिपक गुरव, सागर खोत, सोहेल नावळेकर, योगेश पेटकर, समीर सावंत, हर्षद सांगवेकर, अनिकेत घुरसाळे, अक्षय भोगटे, संकेत सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा