You are currently viewing विकास प्रकल्पांना शिवसेनेचा विरोध का? विजय केनवडेकर यांचा सवाल

विकास प्रकल्पांना शिवसेनेचा विरोध का? विजय केनवडेकर यांचा सवाल

मालवण

वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्या बदल शिवसेना शिदे-भाजपा सरकारचा निषेध करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी जगाचा नकाशावर अधोरेखित करणार सि-वर्ल्ड प्रकल्पाला का विरोध केला हे पण शिवसेनेने जाहिर करावे. जमिन मालकांन मध्ये गैरसमज पसरवुन सि- वर्ल्ड प्रकल्पाचे तिन तेरा वाजवले का वाजवले ? ५० हजार जणाना थेट रोजगार व अप्रत्यक्ष १ लाख जणाना रोजगार मिळणारा प्रकल्पाला विरोध का केला ? फडणविस भाजपा सरकार वेळी जमिन अधिकरण करण्यासाठी ३०० कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. १५० ऐकर जमिन शेतकरी स्वताहून देत होत. तसे सातबारा व हमीपत्र शेतकरी व जमिन मालकानी भाजपा कडे दिले होते. असे असताना सत्तेत असुनही शिवसेना विरोध का करत होती. मग कोकणाच्या विकासाला कोणी खिळ घातली.
सध्यस्थिती पहाता सि-वर्ल्ड नियोजीत जागेत ना आधुनिक शेती झाली किव्हा शेती बागायतीचे लागवड क्षेत्र वाढले. या जागेत नाविन प्रकल्प शिवसेनेने आणला. शिवसेनेचे लोक प्रतिनिधी असताना २५ वर्षात नविन विकसनशिल प्रकल्प का आणला नाही यांची पण उतरे निषेध करताना देणे आवश्यक आहेत. सि- वर्ल्ड ने सिंधुदुर्गाचा चेहेरा मोहरा बदलला असता. स्कुबा व वॉटर स्पोर्टसने बऱ्याच पैकि पर्यटन मालवणात वाढले आहे मग सि- वर्ल्ड आल्यावर परकिय चलनात मोठी वाढ झाली असती परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले असते .असे नकरता मा. नारायण राणेनी आणलेल्या प्रकल्पाना विरोध हा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात समाधान मानून शाश्वत विकासा पासुन कोकणवासीयाना वंचित ठेवण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प आलेच पाहिजे या प्रकल्पाबाबत सकारात्मक भुमिका घेणारी शिवसेना कोकणातील विकासासाठी येणाऱ्या प्रकल्पाला का विरोध करते हे पण स्पष्ट करावे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी भूमिका सोडून रोजगार निर्मिती प्रकल्पाला पाठिबा द्यावा असे प्रभारी मालवण शहर विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा