You are currently viewing जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ‘क्रीडाप्रबोधनी स्थापन करावी..

जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ‘क्रीडाप्रबोधनी स्थापन करावी..

पालकमंत्र्यांकडे क्रीडा शिक्षक महासंघांची मागणी

तळेरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेष अंगभूत गुण असलेल्या गुणी खेळाडूंसाठी ‘क्रीडा प्रबोधिनीची’ स्थापना करण्यात यावी, तसेच विभागस्तरीय स्पर्धेसाठी ‘स्वतंत्र कोकण’ विभागाची निर्मिती करावी अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे काल सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जनता दरबार अंतर्गत आढावा सभेत करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर आम.वैभव नाईक, जिल्हा अधिकारी के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, सचिव दिनेश म्हाडगूत, जिल्हा पदाधिकारी संजय पेंढुरकर, विजय मयेकर, एस.एन.पवार,
किशोर सोन्सुरकर, श्रीम.कल्पना तेंडूलकर तसेच तायक्वांडो असोसिएशन चे सचिव भालचंद्र कुलकर्णी,अॅथलॅटिक्स असो.चे सहसचिव समीर राऊत यांच्यासह संघटनेचेअन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच बेरोजगार क्रीडा शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करावी, शाळा तिथे क्रीडाशिक्षक धोरणाची अंमलबजावणी करावी, नवीन शैक्षणिक धोरण राज्य समितीत एका शारीरिक शिक्षण शिक्षकांचाही समितीत समावेश करावा,
जिल्ह्यातील सिंथॅटिस्क ट्रॅकचे काम त्वरीत सुरू करावे, खेलो इंडिया अंतर्गत विकास आराखड्यात प्रत्येक तालुक्याला खेळाडूंच्या सरावासाठी इंडोअर हॉल बांधण्यात यावेत.
14 मे 1987 चा शासन निर्णयानुसार बीएड समकक्ष शारीरिक शिक्षण शिक्षक प्रत्येक शाळेत नियुक्त करण्यात यावा,प्रत्येक खेळाडूला अपघात विमा देण्यात यावा. यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन सादर करीत या निवेदनातील अनेक मुद्द्यांवर पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बरोबर बयाजी बुराण, दत्तात्रय मारकड व दिनेश म्हाडगुत या पदाधिकाऱ्यांनी विशेष चर्चा केली.या चर्चेत ब-याच मागण्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हास्तरावरील कामे व राज्यस्तरावरील कामांचे विभाजन करुन पाठपुरावा करण्याचे आदेशही जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी तात्काळ दिला.

तालुका केंद्र लवकरच कार्यन्वित करू
तालुक्यातील खेळाडूंच्या विविध खेळाच्या इनडोअर सरावासाठी तात्काळ क्रीडासंकुलचे बांधकाम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी संघटना पदाधिकारींना दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा