कुडाळ
कुडाळ शहरात काल मध्यरात्री चार ते पाच अल्पवयीन मुलांनी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला दहा ते बारा जणांचा अल्पवयीन मुलाचा ग्रुप असून ही सर्व मुले दारू गांजा सेवनकडे वळली आहेत या गंभीर बाबीकडे पोलिसानी लक्ष दयावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी केली आहे
कुडाळ शहरात अलीकडे गेले काही महिने अल्पवयीन मुले त्याचबरोबर युवक युवतीवर्ग मोठया प्रमाणात दारू गांजा सेवनकडे वळले आहेत एमआयडीसी परिसरात काही युवक युवती याना रंगेहाथ पकडण्यात सुद्धा आले होते मात्र अजूनही हा प्रकार सुरू आहे शहरातील जागरूक नागरिकांनी असे धोके उद्धभु नये संबंधितांच्या पालकांनी सतर्क राहावे यासाठी एक ग्रुपसुद्धा सुरू केला आहे आता तर अल्पवयीन मुले याकडे वळली आहेत ही निश्चितच धोक्याची घंटा म्हणावी लागेल आज मध्यरात्री तर कुडाळ शहरातील केळबाई मंदिर परिसरातील घाडीवंश मंदिरातील दानपेटी फोडण्यासाठी चार ते पाच अल्पवयीन मुले आतमध्ये शिरली मात्र त्याचा प्रयत्न असफल ठरला तेथील काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे या मुलांनी तेथून धूम ठोकली याबाबत नगरसेवक भोगटे यांनी सांगितले की शहर परिसरात दहा ते बारा अल्पवयीन मुलांचा ग्रुप असून ही मुले वाईट मार्गाला लागली आहेत दारू गांजा या वाईट गोष्टी सेवन करण्याकडे वळले आहेत एकूणच गांभीर्य ओळखून पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यानी केली ही अल्पवयीन मुले वाईट मार्गाला लागू नये यासाठी पालकांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आज याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अनेक धोके निर्माण होणार आहेत असेही श्री भोगटे यांनी सांगितले