*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुंगी*
भिंतीच्या एका फटीत
राहत होती मुंगी
कडक इस्त्री करून ती
नेसली लाल लुंगी
ऐटीत मुरडत मुंगी
गात होती गाणी
इडलीच्या वासाने तिच्या
तोंडाला सुटले पाणी
डीशमध्ये चढून मुंगीने
तोंडात टाकली इडली
इडलीतील चटणी खाऊन
मुंगी फार चिडली
हाय हाय रे हाय
काय करू गं बाय
तिखट चटणी खाऊन
जीव माझा जाय
पाणी पिण्यासाठी मुंगी
लगेच चढली ताटात
पाय घसरून धपकन
पडली पाण्याच्या माठात
गटांगळ्या खात मुंगी
बाहेर आली कशीबशी
जीव वाचवताना तिला
आठवले रवी शशी
पाणी नाकात जाऊन
मुंगीला लागली धाव
धूर्त चोरट्या मुंगीचे
उघडकीस आले पाप
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*