You are currently viewing बाप्पा

बाप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाप्पा*

बाप्पा तुझा निरोप घेताना
नयनी अश्रू येतात !
‘पुनरागमनायचं’ म्हणताना ,
मनी तरंग उठतात!

तुझे येणे आणि जाणे
वाजत गाजतच होते!
आनंद दुःख त्याचे ,
समुदायातच जाणवते!

अन्य देवी देवतांचे ,
असे वैयक्तिक समाराधन !
हाच एक गणपती बाप्पा,
ज्याचे सारे समाजमन !

तूच बुद्धीदाता, तूच विघ्नहर्ता,
कार्यारंभी तूच असतोस !
सभोवताली प्रत्येक क्षणी ,
आपुले स्थान राखून असतोस!

‘बाप्पा मोरया’ गजरात ,
तुझी पार्थिव मूर्ती विरघळते!
अन् जिवाच्या नश्वरतेची ,
आम्हाला तत्क्षणी जाणीव देते!

उज्वला सहस्रबुद्धे

प्रतिक्रिया व्यक्त करा