सिंधुदुर्ग :
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी सिंधुदिशा संस्था दरवर्षी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवत असते. सालाबाद प्रमाणे यंदाही सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था,सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग स्पर्धा संपन्न झाली. या गायन स्पर्धेत मुंबई मालाड येथील कु. अथर्व उदय गिरकर प्रथम, व्दितीय क्रमांक कु. वृत्तीका कृष्णा परब- भांडुप (मुंबई), तृत्तीय क्रमांक कु. जय समिर राऊळ- पिंगुळी (सिंधुदुर्ग), उत्तेजनार्थ क्रमांक कु. चिन्मयी निलेश मेस्त्री ( इन्सुली- सावंतवाडी), कु. कौशल्य शशिकांत पवार (उस्मानाबाद), कु. मंदार बापु नाईक (तुळस खरीवाडी, वेंगुर्ला), विशेष उत्तेजनार्थ क्रमांक कु. ममता दत्तप्रसाद प्रभु (आजगांव- सावंतवाडी), कु. तेजल रविंद्र गावडे (आसोली- वेंगुर्ला), कु. नितेश दत्ता राऊळ (कोलगांव-सावंतवाडी), कु. धिरज अमित मेस्त्री (ओरोस, सिंधुदुर्ग) परिक्षण- संगीत क्षेत्रातील संगीतरत्न श्री.अरुण म्हात्रे बुवा यांनी केले. संस्थाध्यक्ष रुपेश परशुराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन मुकेश नाईक, राजेश सावंत, प्रशांत परशुराम परब,संतोष ओटवणेकर,विलास राऊळ, विलास गवस, रितेश नाईक, देवेंद्र नाईक, अनिल गावडे, रजत गवस, पुंडलिक जाधव यांनी केलं.