*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*अहंकार.*
दया क्षमा शांति आहे
मानवाचे अलंकार,
काम क्रोध मोह मत्सर
शत्रू त्याचा अहंकार..।
एकदा अहंकाराने
मानवास जकडले,
समजून घ्या सिंहाने
हरिणास पकडले..।
मग त्याच्या हातून
सत्कार्य घडत नाही,
मागे मागे चालतो तो
पुढे पाऊल पडत नाही..।
अहंकाराचे रूपांतर
जेव्हा होते गर्वात,
स्वतःला समजतो तो
श्रेष्ठ शक्तीमान सर्वात..।
इतरांपेक्षा स्वतःला
दर्शवतो तो पावन,
बघता बघता त्याचा
होवून जातो रावण..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*