कणकवली शहर सुधारीत विकास आराखडा बैठक…
कणकवली
कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा तयार होत आहे. मात्र हा आराखडा तयार होत असताना आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. तसेच यापूर्वीच्या आराखड्यात शहरातील ज्या नागरिकांच्या घरांवर आरक्षणे पडली आहेती, ती आरक्षणे उठविल्याखेरीज आम्ही नव्या विकास आराखड्याला सभागृहाची मंजूरी देणार नाही असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज व्यक्त केला.
कणकवली शहराच्या पुढील वर्षाच्या अनुषंगाने शहर सुधारित विकास आराखडात तयार केला जात आहे. या आराखड्यात तज्ज्ञांकडून सूचना आणि अभिप्राय मागविण्याच्या अनुषंगाने आज नगरवाचनालयाच्या सभागृहात शहरातील मान्यवर, नगरपंचायत पदाधिकारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली. यात श्री.नलावडे बोलत होते. या बैठकीला नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक व्ही.टी. देसाई, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकड, ॲड.विराज देसाई, बाबू गायकवाड यांच्यासह अशाेक करंबेळक,स्थापत्य अभियंता योगेश सावंत, संदीप वालावलकर, संदीप ठाकूर, ॲड.नानू देसाई, डॉ.विद्याधर तायशेटे आदी उपस्थित होते.या बैठकीत शहरातील तज्ज्ञांनी शहरासाठी आवश्यक रस्ते, दाट लोकवस्तीमध्ये नव्याने रस्त्यांची आखणी, शहरातील ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, पार्किंग आदींबाबत आपले अभिप्राय मांडले. यावेळी बोलताना श्री.नलावडे यांनी सर्व शहरवासीयांना विश्वासात घेऊनच नवीन आराखडात तयार केला जाईल अशी ग्वाही दिली.
शहराचा विकास आराखड्याबाबत ही पहिलीच बैठक नाही. तर यापुढेही बैठका होत राहणार आहे. शहराचा विकास आराखडा बंद खोली नव्हे तर सार्वजनिक बैठका घेऊनच निश्चित होईल अशीही ग्वाही श्री.नलावडे यांनी दिली.