You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात सर्वात जेष्ठ शिक्षक आसोली येथील लवू लक्ष्मण देसाई यांचा एम. के. गावडे यांनी केला सत्कार

वेंगुर्ला तालुक्यात सर्वात जेष्ठ शिक्षक आसोली येथील लवू लक्ष्मण देसाई यांचा एम. के. गावडे यांनी केला सत्कार

वेंगुर्ले :

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांबद्दल प्रेम असलेले वेतोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी तालुक्यात सर्वात जेष्ठ असलेले आसोली येथील लवू लक्ष्मण देसाई (88) यांचा, त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुरूवर्य या नात्याने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या सत्काराने श्री. देसाई भारावले गेले.

ज्या महान व्यक्तीने या देशात विद्यार्थ्यांना घडवित शिक्षकाची प्रतिमा उंचावली ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशात साजरा करण्यात येतो. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. आणि सेवानिवृत्ती नंतरही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी माणुसकिच्या नात्याने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले जात आहे. अशा जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा आदराने या दिवशी त्यांना मानणारे किंवा विद्यार्थी या दिनी शिक्षकांचा खास त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करीन त्यांच ऋण व्यक्त करतात.

5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून यापूर्वी दरवर्षी जेष्ठ शिक्षीका स्व. मिराताई जाधव यांचा ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करत असत. शिक्षिकी पेशातून पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची कदर करून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते एम. के. गावडे हे दरवर्षी सर्वात जेष्ठ अशा शिक्षकाचा शिक्षकदिनाचे औचित्य साधून सत्कार करतात.

त्यानुसार आसोली येथील जेष्ठ समाजसेवक स्व. अंकुश देसाई यांचे सख्खे बंधु लवू लक्ष्मण देसाई यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यांत आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरात जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. प्रज्ञा परब, सुरंगी महिला औद्यागिक फळप्रक्रिया संस्थेच्या चेअरमन सौ. सुजाता देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर जाधव, देसाई यांचे मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी प्रथमेश देसाई, साक्षी गावडे, श्रावणी गावडे, भगवान गावडे आदींचा समावेश होता.

यावेळी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक लवू देसाई यांनी, आपण आज 88 व्या वर्षीही विविध पुस्तकांचा संग्रह करीत आहे. त्यांचे तसेच वृत्तपत्रांचे वाचन नेहमी करत आहे. त्यातून ज्ञान वाढते. आपल्या घरात कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नाडिस या फार मोठय़ा व्यक्तींचा पदस्पर्श झालेला आहे, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा