*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा, संस्थापक अध्यक्ष श्री.अहमद मुंडे लिखित लेख*
**गुरू गुरू**
आपल्याला आपल्या जीवनाचे महत्व पटवून देण्यासाठी गुरू हे सर्वात मोठे माध्यम आहे. आपणं कायम ऐकतो आपला पहिला गुरू कोण असेल तर आई कारणं आपणांस जन्म देण्यापासून चालायला बोलायला कसं चालायचं कसं बोलायचं याचं ज्ञान आपल्याला आपल्या आईकडूनच मिळते. हातात छडी घेऊन वडत फरफटत मायेने आपल बोट धरून शाळेत सोडणारी म्हंजे आपली आई आपल्या चुका आपलं चांगलं वाईट काम यांवर पडदा घालणं आणि वेळ पडल्यास शासन करण्याचे काम आपली आईचं करत असतें. आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी मिळेल ती मजूरी मिळेल ते काम करून सवता उपाशी राहून आपल्या मुलांना सोन्याचा घास देणारी आईचं म्हंजे देवापेक्षा ही आई थोरच महणलतर वावग ठरणार नाही. हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी राजे शिवछत्रपती यांचं मार्गदर्शन करणारी सुध्दा एक गुरू म्हणुन देवांची देणगी असणारी आईचं होय.
आपलं सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जीवन कसं जगायचं हे शिकविणारे गुरू. शिक्षक हे आपणांस अनमोल असं सामाजिक. आर्थिक. वैयक्तिक. वैद्यकीय. व धंदा व्यवसाय यासाठी समाजातील लोकांशी कसं वागावे. नात्यांचा अर्थ काय. पाप पुण्य काय. भक्ति शक्ति म्हंजे काय. असं विविध ज्ञान देताना वेळ पडल्यास आपणांस शिक्षा करणारे गुरूच कोणताही शिक्षणात भेदभाव नाही पक्षपाती पणा नाही . ही परम कर्तव्य जपाणारे ते म्हणजे गुरू होय.
वासरू ज्या प्रमाणे दूध मिळविण्यासाठी आईला ढोसे मारते त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय माणसाला काहीच मिळत नाही . प्रयत्न केल्याने कार्यात यश मिळते अन्यथा कार्य अपयशी होतें. केवळ दैवावर विसंबून राहील्याने कार्यसिद्धी होत नाही . आपल्या कर्तव्यापासून दूर पळणारा आपल्यावर अवलंबून असणारे आश्रित यांचें पालनपोषण करु शकत नाही. ज्या माणसाला आपली कर्तव्य माहिती नाही तो डोळे असून अंधाळा असतो. कार्य करत असताना सारासार विचार करून विवेकबुद्धी वापरून ते कार्य तडीस न्यावे. अविचारी. अविवेकी बुधदिने काम करणार्या व्यक्तिचा लक्ष्मी त्याग करते. कार्यात येणार्या अडचणी यांवर विचारपूर्वक मात करावी. अयोग्य राजा व अयोग्य धोरण यामुळे निसर्गाचा कोप होतो आणि आपणं नैसर्गिक आपत्तीने त्रस्त होतो. नीती भ्रष्ट व दृष्ट व्यक्तिला राजा म्हणून कधीही सविकारु नये राज्य सरतळाला गेलेच म्हणून समजा. राजानें आपले मंत्री गण आपल्या विचारांचे ठेवलें तर राज्यकारभार अतिशय उत्तम चालतो. मंत्री व सल्लागार यांच्या सल्ल्याशिवाय राजा समस्या सोडवण्यासाठी हतबल ठरतो. राजासारखे तंतोतंत वागण्याचा कधीच प्रयत्न करु नये. दोन राज्यांत इर्षा सुरू असेल तेव्हा त्या इरषेचा आपल्या राज्यासाठी उपयोग करून घ्यावा. पापी दुष्ट लोकांना जन आसवांची पर्वा नसते. उत्साही व्यक्ति प्रसंगी शत्रुवर सुध्दा मात करु शकतो. पराक्रम ही राजाची खरी संपत्ती आहे. आळशी मनुष्य सर्व प्रकारच्या सुखापासून वंचित राहतो. निरुत्साही पणामुळे दैव आणि देव देखील पाठ फिरवतात.
पाण्यात जाळ फेखलयाशिवाय मासे मिळत नाहीत त्याप्रमाणे योग्य हालचाली केल्याशिवाय ध्येय मिळत नाही. विश्वासघात की माणसांवर कधीही विश्वास ठेवू नका. विषाची चव जीभेने कधीचं घेऊ नका. महत्वाचे कार्य करत असताना वैरी बाजूला ठेवा. शत्रु आपणांस मदत करील या भ्रमात कधीच राहू नका. माणसातील संबंध हे त्यामधील हेतूवर अवलंबून असतात. शत्रूंचे मर्म स्थान ध्यानात येईपर्यंत त्यांच्या सोबत मैत्रीचे नाटकं करा. शत्रुचे मर्म स्थान ओळखून त्यावर हल्ला करा. आपले मर्म स्थान आधीही उघड करु नका. मर्मावर घाव घालणे ही शत्रुची सवय असते. पकडलेल्या शत्रुवर कधीच विश्वास ठेवू नका. व्यसनाधीन माणसाच्या हातून कोणतेही काम यशस्वी होत नाही. जो राजा इंद्रियांचा गुलाम असतो त्याच्याजवळ चतुरंगी सेना जरी असेल तरी त्याचा विनाश होतो. जुगार माणसाच्या हातून कोणाचेही भल होत नाही. जो राजा व्यक्ती शिकारीचा शौकीन असतो तो धर्म आणि अर्ध ह्या दोन्ही पुरुषार्थास मुकतो. अर्थ प्राप्तीची ईच्छा मनांत बाळगणे हे एक व्यसन आहे. सत्ता लालसा हे सुद्धा एक व्यसन आहे. कामासकत झालेल्या माणसाच्या हातून कोणतेही चांगले काम घडत नाही. कठोर शब्द हे आगीपेक्षा अधिक चटका लावून जातात. व्यक्तिगत द्वेषामुळे राजानें एखाद्याला शिक्षा केल्यास तो राजा प्रजेच्या रोशाला बळी पडतो. राज्यकारभार उत्तम निःपक्षपाती पणाने चालावा यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते एकटं चालल्यास राज्याचे नुकसान होते. सुखांत दुःखात सारखी साथ देणारा तोंच खरा मित्र असतो. समस्यांच्या वेळी दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा. विवेकहीन व्यक्ती जरी आपला मित्र असला तरी त्याला आपले महत्व पूर्ण निर्णय रहस्ये सांगू नका. सर्व बाजूंनी योग्य परिक्षा घेतल्यावर पदाधिकारी नेमावे.
कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर त्याची अचूक माहिती ज्ञान व नियोजन असणे गरजेचे आहे. कार्य सुरू करण्याअगोदर त्याचा बोभाटा करु नये अन्यथा कार्य सफल होत नाही . कार्य योजना ही कायम गुप्त असावी. महत्वाची मसलत गुप्त ठेवण्यात अपयश आल्यास राज्य घरं धोक्यात येते कार्य योजना कुठल्याच बाजूंनी फुटणार नाही यांचे नियोजन कार्य सुरू करण्याअगोदर लावणे गरजेचे आहे . मसलत गुप्त ठेवणे ही खरी श्रेष्ठ राजनीती आहे. ज्या प्रकारे दिवा अंधारात वाट दाखवितो त्याप्रमाणे राजाचा दिव्य हेतू त्याला संकटातून बाहेर काढतो. योग्य चर्चे द्वारे राजा आपल्या विरोधकांची मर्म स्थळे पाहू शकतो. खलबतं करते वेळी एका मेका बद्दल दुजा भाव ठेवू नये. दोघा व्यतिरिक्त तिसरयाचेही मत तेच आल्यास कार्य सिधदिस जाते. प्रत्येक कार्याचे तत्व ओळखू पाहणारा व्यक्ती खरा मंत्री. पदाधिकारी होण्यास लायक असतो. कार्य हेतू गुप्त असावा तो षटकरणी होता कामा नये. संकटकाळी आपली साथ सोडत नाही तोच खरा मित्र असतो. मित्राचा संग्रह म्हणजे बलवृधदी होय. खरया मित्राच्या सहहयाने राज्य प्राप्ती होऊ शकते. आळशी माणसाला ऐश्वर्य प्राप्त होत नाही. आणि जरी झाले तरी ते टिकविता येत नाही. आळशी मनुष्य ऐश्वर्य रक्षण करु शकत नाही. आळशी मनुष्य हा परावलंबी असतो. दुसरयाकडून योग्य काम करु घेणे राज्याची भरभराट करणे हेच खरे राजतंत्र आहे. राजतंत्रात नीतीशात्राची सांगड असावी. राज्याचा विकास योग्य राज्यतंत्रावर अवलंबून असतो. अंतरंग परस्थिती हाताळताना राज्य तंत्राचा खरा कस लागतो .
परस्पर अंतर्गत संबंधांवर राज्याचा ढोलारा उभा असतो. कुणाशी मैत्री करावी. कुणाशी करु नये यांवरच माणसांचे भवितव्य अवलंबून असते. प्रयत्नपूर्वक केलेल्या कामात यश मिळतेच. दैव नेहमी प्रयत्न करणारे यांच्याच मागे असते. परंतु दैवाची साथ नसेल तर प्रयत्न करुन सुध्दा यश मिळत नाही. चंचल पणा हा नेहमीच यशाला दूर ठेवतो. कोणत्याही कामाची कार्याची दिशा ठरविल्यानंतर त्या कार्याला कामाला सुरुवात करावी. कोणत्याही कामांत कार्यात आळसपणा विलंब करु नये. चंचलपणा हा नेहमीच कार्यात मोठा अडथळा असतो. कार्य हस्तगत करण्यासाठी साधनांचा सदुपयोग करावा. दोषविरहीत अडथळा विरहीत काम कार्य घडून येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. ज्या कामाचा कार्याचा परिणाम वाईट असेल असं काम कार्य सुरुच करु नका. येणारा काळ बघून जो पाऊले टाकतो त्याचेच कार्य सफल होतें. कोणतेही काम कार्य वेळेतच झाल्यास सफल होतें. एकदा एखादे कार्य निश्चित झाले की ते पार पाडण्यासाठी अजिबात वेळ दवडू नये. नीतीशात्र परिपूर्ण राजा हाच खरा राजा होय. शत्रू जवळचाच असतो. शत्रू आपला मित्र असण्याची शक्यता जास्त असते. हेतू भिननता हे मित्रत्व आणि शत्रूत्व यांना जन्म देते. निर्बल यांनी सबलाशी तह करावा. एकामेकाशी संधान साधल्यास दोन्ही राज्यांची शक्ति वाढते. आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी राजांची ताकद कमी असेल तरच त्यांच्यावर आक्रमक करावे. आपल्यापेक्षा बलवान समान शक्ति असलेल्या राज्यांशी शत्रूत्व पत्करू नये. बलवानाशी युद्ध करणे म्हणजे पायदळातील सैनिकाने हत्तीवर अंबारीत बसलेल्या शी युद्ध करणे होय. एक कच्चे मडके दुसरया कच्च्या मडकयावर आदळलयास दोन्ही फुटतात .
असं गुरुंचे ज्ञान आपणास जगण्याचा मार्ग दाखवितात
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859