You are currently viewing सिंधुदुर्गात शिवसेना युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील : ब्रिगे. सुधीर सावंत

सिंधुदुर्गात शिवसेना युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील : ब्रिगे. सुधीर सावंत

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रारंभिक प्रश्न अद्यापही मान्य केले नाहीत. जिल्ह्याचा विकास पर्यटनातून होऊ शकतो यासाठी या ठिकाणच्या पर्यटन विकासाला अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.

जिल्ह्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात करत आहोत.या जिल्ह्यात युतीबाबत निर्णय आमचे वरिष्ठ निर्णय घेतली, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी कृषी सभापती संदेश पटेल,सुनील पारकर,भास्कर राणे,माजी नगरसेवक भूषण परुळेकर,दामू सावंत यांच्यासह शिंदे गट शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर या जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र तो कुठे गेला हे अद्यापही समजले नाही. आम्ही तारकर्ली येथे तंबू निवास चालवले. जिल्ह्याच्या किनारी भागात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या विविध योजना राबवल्या. न्यारी निवास योजना राबवत असताना जिल्ह्याचा पर्यटनात्मक विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न आपण केले आहेत. आगामी काळात पर्यटनातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सुधीर सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण मुले क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ओलंपिक पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच येथील शेतीचा शाश्वत विकास झाला पाहिजे हे आमचे धोरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणाला अनुसरून येथील उत्पादित शेती मालाला अन्य भागात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही सुधीर सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा