देवगड
पश्चिम कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला आले आहेत
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्यावर पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नौकानी देवगड बंदराकडे आपला मोर्चा वळवला आहे गुजरात राज्यातील सुमारे 30 नौका देवगड बंदरात मुक्कामाला आले आहेत त्याचपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच तमिळनाडूमधील नौका देवगड बंदरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे बंदर अधिकारी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा वादळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे