*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनाल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*
*…… चार शितं…….*
कुकरच्या भांड्यात भाताची चारच शितं उरली होती .. तिने ते भांडं तसच धुवायला टाकलं.. तिची कामवाली आली तिने ती चार भाताची शितं घेतली आणि बाहेर बांधावर ठेवली.. काही वेळातच कावळा आला आणि खाऊन गेला.. त्या भातावर त्या कावळ्याचं पोट भरलं.. नाहीतर भात मोरीत वाया जाणार होता…
असतील शितं तर नाचतील भुतं ही म्हण माहीत असेलच.. त्याचा नक्की अर्थ काय असेल माहीत नाही पण ज्याच्याकडे पैसा , प्रतिष्ठा त्याच्या अवतीभोवती मानवरुपी भुतं नाचत असतात हे मात्र खरं…
पैसा असणारा व्यक्ती खरच उपयोगी पडेल का माहीत नसतं.. पण चार भाताची शितं कावळ्याला देउन त्याचं पोट भरणारी तिची कामवाली पैसे नसतानाही मोठा धडा देउन गेली…
सोसायटीतील एका स्त्रीने गौरीच्या हळदी कुंकवासाठी बोलावलं म्हणून गेले तर तिच्या फ्लॅटच्या बाहेर तीच कामवाली मावशी पायरीवर बसलेली दिसली.. तिला म्हटलं मावशी इथे का बसलाय तर ती म्हणाली ताई म्हणाल्या हळदीकुंकु देते , बराच वेळ झाला थांबलेय.. मी आत जाऊन त्यांना म्हटलं , मावशीला आत बोलवुन हळदीकुंकु द्या आणि मग मला द्या .. त्यावर मालकीणबाई म्हणाल्या , बसुदेत तिला , सोसायटीतील सगळ्या बायका येउन गेल्या कि देते तिला.. मला हा प्रकार खटकला.. मी हळदकुंकु घेउन घरी निघुन आले .. मनापासून अस्वस्थ झाले.. मी हळदीकुंकवाला का गेले ? .. जिच्याकडे हा भेदभाव आहे तिने गौरी का बसवाव्यात आणि हळदीकुंकु तरी का करावं ?? .. जिने पक्षाचं पोट भरायला शिकवलं त्या महान स्त्रीने तिच्या पायरीवर तिष्ठत का बसावं?? .. फक्त गरीब म्हणुन , कामवाली म्हणुन की अजुन काही…
आज बऱ्याच जणींकडे गौरीपुजन आहे.. हळदीकुंकु आहे त्यांनी सगळ्यात आधी घरातील कामवालीला पोटभर जेवु घाला आणि मग भरपेट रोजच जेवणाऱ्या सवाष्णीला जेवायला द्या.. खऱ्या खुऱ्या अर्थाने गौरी पुजन होइल…
सोच बदलो… देश बदलेगा…
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री
8380087262