माझ्या जीवनातील हर्षाचा दिवस..
दववर्षीप्रमाणे या वर्षी देखील वाढदिवस साजरा केला.
पण या दिवसाचे महत्व जरा हटके आहे.
काल मी माझ्या घरी ज्या मावशी काम करतात त्यांनाच काही महिलांना घरी बोलवण्याचे आमंत्रण दिले.त्याही महिला होतकरू,प्रामाणिक,संसारासाठी काम करणार्या आहेत.यांना बोलावून मी माझा वाढदिवस साजरा केला.माझ्या मुली कोमल,शीतल ,पती वैभव,मुलगा आदित्य ,जावई सागर,अभिषेक ,घरातील सर्वजण दीर,जाऊबाई या सर्वांची साथ खंबीरपणे होती.
जरा हटके केलेला माझा वाढदिवस खूप काही सांगून गेला.
माणूसकी,प्रेम,जनरीत सर्व काही…
त्या भगिनींच्या हातून ओवाळून घतले.केक कापला.सर्वांच्या मुखकमलावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
सर्वांना गिफ्ट दिले. हळदी,कुंकू लावून थोरांना नमस्कार केला ..हे सर्व करताना मानसिक समाधान खूपप मिळाले.
जाताना या भगिनी जे वाक्य बोलल्या त्या वाक्याने मनात घर केले.
“बाई,आज तुम्ही आम्हांला खूप मान दिलात,असा मान या समाजात नाही मिळत हो आमच्यासारख्या महिलांना.”
खरच या वाक्याने मन भरून आले.
असा हा आगळावेगळा माझा वाढदिवस साजरा करताना नातवंडेही साथीला होती..
थोर महिलांनी तोंड भरून दिलेले आशीश ,आईचे आशीश ,सर्व मित्रमैत्रिणींनी दिलेल्या शुभेच्छा ,कधीही समोर भेटलो नाहीत अशा सर्वांनी खूप छान शब्दफुलांची बरसात केली.असा माझा कालचा वाढदिवस आंतरीक वेगळेच समाधान देवून गेला.
*सौ.वसुधा नाईक,पुणे*