*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*माझी गौराई*….
*आली आली गं गौराई*
*सोन पाऊली पाहुणी*
*दृष्ट काढते लाडके*
*लिंबलोण उतरुनी*…
*नाकी नथीचा तो झोक*
*शालू नेसली हिरवा*
*कटी मेखला सुंदर*
*भाळी हसतो चांदवा*..
*गणपती समवेत*
*कशी बसली थाटात*
*ओवाळीते पंचारती*
*महा नैवेद्य ताटात*…
*भाजी-भाकरी गौराई*
*तुला पहिल्याच दिनी*
*भोग मिष्टान्नाचा देते*
*बोलावून सुवासिनी*..
*थाट हळदी-कुंकाचा*
*तुझ्या पुढ्यात घालीते*
*जागवून रात सारी*
*फेर अंगणी धरीते*..
*माझी लाडाची गौराई*
*देई समृद्धीचं दान*
*यावे हरसाल घेण्या*
*तुझं माहेराचं वाण*.
*खण-नारळ गौराई*
*ओटी तुमच्या घालते*
*देते निरोप हसून*
*तरी पाणी डोळा येते*..
*सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*
*9011659747*