सावंतवाडी:
Covid-19 हे जागतिक संकट आहे, देशातील धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली करावीत, की नाही याचे अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिले असले तरी, कोरोना महामारी संकटात धार्मिक स्थळ खुली करणं हिताचे नाही. त्यासाठी कुणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अतिशय चुकीचे ठरेल. असे प्रांजळ मत काँग्रेसचे सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा केली.
केंद्र सरकार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रम राबवून covid-19 च्या पार्श्वभूमीवर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, असे आवाहन करत असताना, या महामारी काळात सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय पक्ष मंदिर खुली व्हावीत यासाठी आंदोलनाची भूमिका घेत आहेत हे चुकीचे आहे. पोलिसांनी यावर केंद्र व राज्य शासन कायदा अंतर्गत कठोर भूमिका घ्यायला हवी, याबाबत अड. राजेंद्र नार्वेकर यांनी पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी covid-19 संकट टळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुली होऊ नयेत, अशी भूमिका ॲड. नार्वेकर यांनी मांडली आहे.