अभ्यासक्रम पूर्ण झाला नसताना बोर्डाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास हाणून पाडला…विद्यार्थ्यांनी मानले मनसेच्या पदाधिकऱ्यांचे आभार
कुडाळ
पिंगुळी येथील डॉन बोस्को उद्योगशाळा या खाजगी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात संस्थेने मॅकनिकल मोटार व्हेईकल च्या विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर ह्या एका विषयाचा वर्षाचा काहीच अभ्यासक्रम झाला नसताना फक्त बोर्डाचे पत्रक आले म्हणून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अट्टाहास होता. अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षेस शाळा व्यवस्थापन स्पष्ट शब्दात नकार दिला परंतु शाळा व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका घेत परीक्षेस नकार देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अक्षरशः शाळेच्या बाहेर काढले त्याचबरोबर कोरोना विषाणू प्रादुर्भाव संरक्षक उपाययोजना चित्तर दूत प्रशालेमध्ये नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनात सदरची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीवर थांब राहिले व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागास याबाबतचा पत्रव्यवहार करण्याची विनंती प्रशालेच्या प्राचार्यांना केली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर प्रशासन लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांनी मनसेचे पदाधिकाऱ्यांची संपर्क केला. तदनंतर मनसेचे उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे, कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक व कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब यांनी पिंगुळी येथील प्रशिक्षण केंद्रात धडक देत व्यवस्थापनाला धारेवर धरले. व ह्या कोरोनाच्या बिकट परिस्थिती मध्ये ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाइन परीक्षा घेण्याची सूचना केली. शेवटी डॉन बॉस्को चे मुख्याध्यापक यांनी बोर्डाकडे विनंती करून ऑनलाइन परीक्षा घेऊन आणि ज्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही त्या विषयांची परीक्षा तात्पुरती रद्द करू असे आश्वासन दिले व तसा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्राशी पत्रव्यवहार केला. विद्यार्थ्यांनी मनसेच्या पदाधिकऱ्यांचे आभार मानले.