ना. दिपक केसरकर व उद्योग मंत्री ना.उदय सामंत उपस्थित राहणार
कणकवली
माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांनी शिंदे सरकारमध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. त्यांचे भव्य स्वागत व सत्कार कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर यांच्या हस्ते ब्रिगे. सुधीर सावंत यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमास उद्योग मंत्री ना.उदय सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्तीत राहणार आहेत.
सर्वप्रथम ब्रिगे. सुधीर सावंत यांचे शिवाजी चौक येथे भव्य स्वागत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर मातोश्री मंगल कार्यालयात भव्य सत्कार होणार आहे.
ब्रिगे. सुधीर सावंत याना जिल्यात मानणारा एक मोठा गट आहे. ते काँग्रेसचे खासदार व आमदार असताना जिल्याच्या विकासात भरीव काम केले आहे. सध्या त्यांनी माझी सैनिकांचे महाराष्ट्रभर संघटन केले आहे.
कृषि विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, सैनिक स्कुल, सैनिक पतसंस्था, बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, शिवाजी मंदिर दादर, सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिंदे सरकारमध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच ब्रिगे. सुधीर सावंत जिल्यात येत आहेत. त्यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक मंदार परुळेकर, भास्कर राणे, भास्कर काजरेकर यांनी केले आहे आदीने केले आहे.