माणसाच्या निरोगी जीवनासाठी राजभाज्याचे महत्व अधिक एस. पी. वेल्हाळ
बांदा
निसर्गातील विविध रानभाज्या खाल्यास त्याचा फायदा रोजच्या जीवनात नक्कीच होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्ठीक आणि जीवनसत्व असलेला आहार घेणे गरजेचे आहे, असे मत गोगटे वाळके महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या एस. पी. वेल्हाळ यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान कोकणाला वनसंपदेचा वारसा आहे. हा वारसा जपला पाहीजे. अन्यथा पुढच्या पिढीला त्याचे महत्व कळण्यास अडचणी येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. राजजाई निसर्ग मंंडळाच्यावतीने महाविद्यालयात रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
पानवळ येथील गोगटे वाळके कोकणच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये अनेक वनौषधी वृक्षाबरोबरच नानाविध रानभाज्यांचा खजिना या परिसरात सापडतो. येथील वातावरणाला पोषक व विविध जीवनसत्वे असणाऱ्या रानभाज्यांचा दररोजच्या आहारात वापर करावा असे आवाहन विविध वक्त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध भाज्यांची सुबक मांडणी केली होती. प्रत्येक भाजीची लिखित संकलित माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भाज्यांची विक्री देखील करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. उमेश परब, प्रा. डॉ. अभिजित महाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले.