*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आज बाप्पा आले*
बाप्पा तुम्ही आले, मी येऊ नाही शकलो
मी माझ्या परीने, प्रयत्न करून थकलो
वाटले होते पहिली, आरती करेल तुझी
स्वागताला येण्याची, खुप इच्छा होती माझी
पण तुला भेटायचे, योग नाही जुळले
रजा मंजूर नाही, जेव्हा मला कळले
सांत्वन केले मी माझी, समजूत घालतो मनाला
आता नाही जमले बाप्पा, येइल पुढल्या सणाला
हाक देतो बाप्पा तुला, साद मला देशील का?
यावेळी बाप्पा तूच, माझ्या भेटीला येशील का?
पायाची धूळ तुझ्या, लावील समजून चंदन
गणपती बाप्पा तुला, येथूनच माझे वंदन
श्री रामदास आण्णा