You are currently viewing संत गजानन

संत गजानन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम अभंग रचना*

*संत गजानन*

धन्य धन्य झाली । शेगाव नगरी
संत भूमीवरी । प्रगटता ।।१।।

उष्ट्या पत्रावळी।जाहल्या पावन
करीता ग्रहण। अन्न उष्टे ।।२।।

पाटील मंडळी। छळाया लागले
शरणचि आले। गजानना ।।३।।

दीन दुबळ्यांचे।दुःख होई दूर
आळविता सूर। भक्तीभावे ।।४।।

पाहता लोचनी। वाटे वेडापिसा
दिगंबर ऐसा।अवधूत ।।५।।

तूजविण कोणी।नाही मज आता
गुरु जगी त्राता। मुर्तीमंत ।।६।।

जाता पंढरीसी। भेटे विठ्ठलास
ऋषीपंचमीस। समाधिस्त ।।७।।

चंद्रशेखर द. धर्माधिकारी
पुणे.©️

प्रतिक्रिया व्यक्त करा