*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*जन्म बाईचा….खूप घाईचा*
*कर्तृत्ववान*
बाई असं तुझं येणं
जणू वळीव पाऊस
कधी येतो कधी जातो
आहे कुणा का गं हौस।।
जन्म बाईचा ….खरंच किती वेगवेगळे, विविधांगी अनुभव येतात.जन्म झाल्यापासून ;मुलगीच झाली का येथून तिचा चिवट प्रवास सुरू होतो.काही असतात हौशीवान ,भाग्यवान पण विशेषत्वाने मुलींना नकारघंटाच.अर्थात सामाजिक कारणं महत्वाची त्यासाठी. शिक्षण,कपडे,वस्तू सर्व च बाबतीत मग भेदभाव जाणवतो.
मुलगा शिकावा म्हणून मुलीचं शिक्षण बंद.लवकरच लग्न..
हुंडा द्यावा लागू नये म्हणून तडजोडी..मुलीच्या मनाचा विचार नसेच.पण संसार सुंदर निभवायची,कोंड्याचा मांडा करायची.
घरची गृहछिद्र झाकायची..व मुकाट संसारात आनंद मानायची.असं स्वतःला विसरून जगलं की कुटुंबातील सगळे आनंदात असत.ती तशीच मनात गुदमरत राही…!
पण मला वेगळं सांगायचंय.
हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे.आपण बघतोच आहोत.
मुली पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून जिद्दीने शिक्षण घेत आहे.कष्ट करायची तयारी,पैसे जाणीवपूर्वक जपून वापरत त्या शहरात मनापासून
नावीन्यपूर्ण विद्याशाखेत उत्तम शिक्षण घेत यशाच्या पायर्या चढत आहेत.मुली असून स्वाभिमान जतन करायला शिकत आहेत.शिक्षणाने एक आत्मविश्वास त्यांच्या त निर्माण झाला, आणि स्वतःचे निर्णय ,मग नोकरी,लग्न त्या स्वतःविचारांती घेतात,प्रसंग ी पालकांनाही आपले म्हणणे मुद्दे सूद सांगतात.लग्नाआधी परदेशात एकटीने राहून सर्वांशी मिळून मिसळून जीवनातील सर्व वाटचाल आत्मविश्वासाने
चालतात.ही यशाची पावलं संस्कारांनी मजबूत असतात.
त्यांची गरूडझेप त्या स्वतः
सिध्द करतात.व यशश्री त्यांना माळ घालते.
विवाह हीच इतिकर्तव्यता नाही ,हे लतादीदी सारख्या अनेक नामवंत व्यक्तींनी दाखवलं आहे.इतिहास काळातही ,सती न जाता राज्य कारभार चालवणार्या रणरागिणी होत्या.सावित्रीबाई नी अनेक वाईट सामाजिक प्रथा ना विरोध करून मुलींना शिक्षित केलं.केवढे कर्तृत्व, आणि उपकार.
त्यासाठी हवी मनाची शक्ती,खंबीरपणा आणि नेतृत्व गुण!
अनेक महिला परिस्थितीला शरण न जाता स्वकर्तुत्वाने
आपले यश सिध्द करून दाखवले.अपंग ,अनाथांनी अचाट सामर्थ्य दाखवले.
फक्त स्रियांनीही आपण मुलगीच आहोत,आपल्या नशीबी हेच भोग असणार,ही भावना कुटुंबातच जाणवू देऊ नये. समान शिक्षण ,समान संस्कार मुलांना द्यावेत ज्यामुळे घरी सासरी जाणारी मुलगी व घरी येणारी सून आपापल्या गुणांनी घर उजळून सगळ्यांची मनं जिंकेल.
बदल होत आहेत ,आपणही बघतच आहोत.चला तर बाईच्या उज्वल भवितव्याची अनुभूती घेऊ या….!
🎉💫💫🎉💫💫🎉💫💫*अरूणा दुद्दलवार✍️*