तळेरे
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष हरी भावेसाहेब यांचे निधन मालवण तालुक्यातील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ही प्रशाला चालवणाऱ्या त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई या संस्थेचे माजी अध्यक्ष कै.हरी रघुनाथ भावे(७९)यांचे मुंबई येथे अल्प आजाराने दु:खद निधन झाले. मुळ असगणी गावचे रहिवासी असलेले कै.हरी भावे हे नोकरी निमित्त मुंबई येथे राहत असले तरी असगणी, शिरवंडे, किर्लोस या गावातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असत. त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई या संस्थेचे संस्थापक सदस्य असलेल्या भावेसाहेब यांनी पुढे संस्थेचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व अध्यक्ष ही पदे भुषवली. शिरवंडे हायस्कूलच्या दैदिप्यमान प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शांत, संयमी, प्रभावी वक्तृत्व, समोरच्याला आपलेसे करून घेणारे व स़स्था व शाळेच्या प्रगतीसाठी तळमळीने काम करणाऱ्या भावेसाहेबांच्या निधनाने संस्थेबरोबर शाळा व असगणी गावाची अपरिमित हानी झाली आहे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून असगणी शिरवंडे किर्लोस परिसरातील अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे शोकसभा आयोजित करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.