You are currently viewing जागतिक रंगा, खरंच तो एक तरंगा

जागतिक रंगा, खरंच तो एक तरंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच समूह प्रमुख श्री.पांडुरंग वसंत कुलकर्णी …एक अजब रसायन…*

*जागतिक रंगा, खरंच तो एक तरंगा*

*व्यक्तिविशेष*

श्री. पांडुरंग वसंत कुलकर्णी. हे एक अजब रसायन आहे. कवी, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार, अभियंता, उद्योजक, यशस्वी आजोबा, वडील, मुलगा, चांगला मित्र, भाऊ ,सखा, सोबती, मार्गदर्शक, नवरा, हाडाचा शेतकरी.
भारतातील भोसे नावाच्या खेड्यातला हा माणूस अमेरिकेतच जास्त रमातो. गावरान वागणं बोलणं पण अमेरिकेत असताना वाटतात की जणू काही ते अमेरिकनच आहेत. पक्के वारकरी पण खूप तमाशा शौकीन. ते जेवढे तन्मयतेने विठ्ठल भक्तीत रमतात, तेवढयाच तन्मयतेने लावणी मध्येही रमतात.
साहित्य म्हटले तर सर्वांगीण सर्फिंग. सर्व प्रकारचे लिखाण व काव्य करतात , गायन, वादन करतात. मागील वर्षी कोकण गोवा मराठी परिषदेला शेकोटी संमेलनास त्यांना सन्माननीय उद्घाटक म्हणून सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील जागतिक बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात त्यांचा सहभाग होता.
शेतीची सर्व कामे जाणणारे, साहित्यात रमणारे, भाविक, पांडुरंगाचे भक्त व उत्कृष्ट तंत्रज्ञ आहेत .स्वतःच्या पाच कंपन्यांचे ते सीईओ, चेअरमन डायरेक्टर होते. पण ते सर्व सोडून आता छान आनंदी स्वेच्छेने निवृत्तीचे जीवन जगत आहेत. सर्व जबाबदाऱ्या मधून मुक्त होऊन आनंदाने सगळीकडे वावरत असतात. वय वर्षे पासष्ट पण पस्तीसचे वाटतात. कोणत्याही विषयाचे त्यांना वावडे नाही. टीव्ही, रेडिओ,संमेलने,उद्योग, या क्षेत्रात तर ते असतातच, पण सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही ते पुढाकार घेतात.
स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावरील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे अनेक गौरव झालेले आहेत. आकाशवाणी
निवृत्ती नंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी साहित्य कला व्यक्ती विकास मंच स्थापन केला. तो व्हॉटसअप समूह स्वरूपात ही आहे. आता तर त्याची संस्था म्हणून सरकार दरबारी नोंदणी ही झालेली आहे. या माध्यमातून व्यक्तीविकास घडवून आणण्याचं महान कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे व तो हळु हळू सफल होत आहे . उर्वरित आयुष्य साकव्य च्या माध्यमातून समाजकार्यासाठी अर्थातच व्यक्तित्व विकासासाठी समर्पित करण्याचा मानस त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केला.
असा भक्कम माणूस आपला समूह प्रमुख आहे याचा साकव्य परिवाराला अभिमान आहे.
त्यांच्या विषयीच्या माझ्या मनातील उत्स्फूर्त भावना मी माझ्या खालील कवितेतून व्यक्त करीत आहे.

*रंगा*

धूम धमाल रंगा बहुगुणी तरंगा
खुशनुमा तू कलियुगी पांडुरंगा..

तो सावळा भोळा लेकुरवाळा
त्याच्या पुढे मागे संतांचा मेळा
तुज जीवनी मित्रांचा गोतावळा
वाढले वय परी खोडकर बाळा
जिथे तिथे घालतोय नेहमी दंगा
खुशनुमा तू कलियुगी पांडुरंगा ..

तो हात कटेवरी उभा विटेवरी
चंद्रभागा संथ वाहते पंढरपुरी
तुझी मात्र नेहमी परदेश वारी
फिरत राही लावून पाया भिंगरी
तू आहेस अवखळ अल्लड भुंगा
खुशनुमा तू कलियुगी पांडुरंगा..

जेथे जातो तेथे असतो सांगाती
दर्शने झडते पाप मिळतेय सद्गती
तू म्हणजे हमखास पक्की दोस्ती
तू बादशाह हास्य विनोद निर्मिती
तुझ्या वाणीतून वाहते पाक गंगा
खुशनुमा  तू कलियुगी पांडुरंगा…

त्याला भावतात तुळशीच्या माळा
शोभतोय कपाळा चंदनाचा टिळा
तुज छंद चांदनीचा कवितेचा लळा
गाणे बजावणे तुझा फुलतो मळा
सहवास लाभता उदासी होई भंगा
खुशनुमा
तू कलियुगी पांडुरंगा …

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा