वेंगुर्ला
सध्याच्या आधुनिक युगात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.त्यातुनच कॅशलेस व्यवहारावर करण्यावर लोकांचा भर आहे आणि त्याचाच विचार करून सैनिक पतसंस्थेने पण लोकांना संस्थेच्या माध्यमातून मोबाईल ॲप्स, मोबाइल बँकिंग,एन इ एफ टी,आर टी जीएस सारख्या सुरू केल्या आहेत.आता तर संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले ते म्हणजे संस्थेने आमच्या संस्थेकडे खाती असणाऱ्या व्यापाऱ्यांना QR CODE दिला आहे. म्हणूनच QR CODE चे वितरण संस्थेच्या सर्व शाखा मधुन करत आहे.
तसेच QR CODE चे वितरण संस्थेच्या वेंगुर्ला शाखेकडून दिनांक २५.०८.२०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शाखा कार्यालयात करण्यात आले.सदर कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष श्री.गणपत कासार, शाखा संचालक श्री.प्रताप राणे, श्री.मंगेश पेडणेकर, श्री.देवेंद्र गावडे, श्री.रामकॄष्ण मुणगेकर , संचालीका श्रीमती सरोज परब व श्रीमती शुभांगी गावडे त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक सौ.ज्योती देसाई, कर्मचारी श्री.नितीन बेहरे , कु.ज्योती वंडर,कु.काजल गिरप, श्री.शंकर दिपनाईक, श्री प्रदीप दाभोलकर, श्री.दत्तप्रसाद तांडेल,श्री.जितेंद्र लाड , क्युआर कोड व्यवस्थापक श्री.मयुर गवळी व व्यावसायिक खातेदार उपस्थित होते.यावेळी श्री.गवळी यांनी QR CODE ची माहिती, उपयोग व कसा वापरावा यावर मार्गदर्शन केले.