*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पदर ! आईचा !*
पदर!तिनं माझ्यावरून झाकला
तो पदर माझा झाला
मी आश्वस्त झालो
तो पदर जगण्याचा आधार झाला..!
तशी ओळख तिची
मला तिच्या पोटातच झाली
नऊ महिन्यांनी तिच्या पदराची
ओळख मुठीच्या स्पर्शाने दिली..!
पदराला धरून चालू लागलो
गर्दीत तो माझा दीपस्तंभ होता
रणरणत्या उन्हात!थंडी पावसांत
तो पदर जीवापाड जपत होता..!
पदराने शिकवण दिली संस्कार दिला
पदराचा मान राखायचा आदेश दिला
सौजन्य!सभ्यता!सहिष्णुता!सजगता
जपण्याचा जन्मभराचा संदेश दिला..!
सुगंध सौख्याचा भाव भक्तीचा
इथेच सोडून!पदर मुक्तीला निघाला
थांब जरा!जाऊ नकोस इतक्यात..!
तुझ्याविना कोण आहे गं झाकायला..
पदर तुझी वाट पाहत असेल…..!
थकलास की!ये पदरात निजायाला.!
बाबा ठाकूर