You are currently viewing . रोज रोज तेच का ??……

. रोज रोज तेच का ??……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*….. रोज रोज तेच का ??……*

बदल हा आपल्याला हवा ,,निसर्गाला नाही .. तरीही प्राजक्त म्हणाला , आज कुछ तुफानी करते है ! ,..
आज फुलांना झाडावरुन खाली पडायचच नव्हतं.. लोकांनी आपल्याला तुडवावं आणि आपण निमूटपणे ते सहन करावं हेच अनेकवर्षे करत आलोय.. आणि खाली पडलेली फुले यांना देवाला वहायचीही नसतात जी झाडावर आहेत तीच हवी असतात मग मी पडुन आपटुन घेउन फायदा तो काय.. हे खुशाल साहेबासारखे आमच्यावरुन जाणार साधी कृतज्ञता सुध्दा नाही..
पण आमचा भार आमच्या आईला( झाडाला) सहन होइल का?? म्हणूनच निसर्गाने ही सोय केली असावी… आमची आई खूपच नाजुक .. तिच्या फांद्या वाकवल्या तरी तिची हाडे कडकन मोडतात.. नको हा नको तो हटट कारण आमच्या आईला त्रास देण्यापेक्षा आम्ही तुडवुन घेउ..
तिच्या बाळाचे हे प्रेमळ स्वर ऐकुन तिच्या डोळ्यात पाणी आले जे फुलांच्या रुपात जमीनीवर ओघळले.. एका आईचे अशृ तुडवण्याचा अधिकार आपल्याला नाही.. शक्यतो चालताना फुलाना पाय न लावता चालायचा प्रयत्न करुयात .. परवा हरितालिका त्यानंतर गणपती .. अक्षदा, वस्त्र नदीत विसर्जन न करता पक्षाना द्या.. वस्त्रांपासुन ते घरं बनवतात.. निसर्गाने दिलेलं त्यालाच परत देउ.. गुलाल जितका कमी वापरता येइल तितका वापरु.. धातुची मूर्ती वापरली तर पाणी प्रदूषण होणार नाही.. धरणी आईला वाचवण्यासाठी आपण हे करुच शकतो हेच तर शिकवलय प्राजक्ताच्या फुलानी..
पहा विचार करुन
सोच बदलो .. देश बदलेगा..
आणि हो मी हे सगळं पाळते म्हणुनच लेखिका म्हणुन वाचकाना सांगण्याचा माझा अधिकार रहातो..
असच प्रेम राहुदेत..

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री
8380087262

प्रतिक्रिया व्यक्त करा