*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*
*….. मेकअप मागील चेहरा….*
एक सुंदरी… ती खरच सुंदर होती पण उत्तम विचाराने आणि चांगल्या स्वभावाने पण तिचे फोटो पाहुन , सावळा रंग पाहुन लोकांनी तीची टिंगल केली.. कारण आपल्याला मेकअप केलेला चेहरा आवडतो.त्या व्यक्तीच्या जोपर्यंत जवळ जात नाही तोपर्यंत तिचा स्वभाव कळणार कसा?? .. पण जवळ जायला यांना गोरा रंग हवा त्याचाच परिणाम हा असा…
लोकांच्या वाईट कमेंट्सना कंटाळून तिने सुंदर दिसण्याचं निश्चित केलं.. ट्रीट्मेंट करुन घेण्याइतपत तिच्याकडे पैसे नव्हते मग या सावळ्या रंगाचं काय करायचं?? आणि डागाळलेल्य त्वचेचं काय करायचं?? .. मेकअप कंपन्या भरमसाठ क्रीमचा मारा करतात त्यातील वापरुन पाहु .. ती स्पा ला गेली तिने काहीतरी सांगितले .. ती स्कीनस्पेशालिस्टकडे गेली तिथे पाचहजाराला बांबु लागला .. कोणी म्हणलं दुध हळद लाव पण तिला लगेच रिझल्ट हवा होता तो काही मिळेना.. ती डीप्रेशन मधे गेली.. मनातल्या मनात म्हणाली, माझा स्वभाव इतका सुंदर आहे त्याचं कोणालाही कौतुक नाही.. एकदा ती मेकअप आर्टिस्ट ला भेटली.. तिलाही एक मॉडेल हवं होतं.. तिच्याकडून फ्री मेकअप करुन मिळाला आणि तिने आरशात पाहिले तर ती लोकांच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर दिसत होती…मेकअप आर्टीस्टला इंस्टावर तीची ॲड करायची होती त्यामुळे सलग चार दिवस ती वेगवेगळे मेकअप आणि हेअरस्टाईल करुन फोटो शेअर करु लागली.. फोटोला प्रचंड लाइक्स ,कमेंट येउ लागले.. मेकअप आर्टीस्ट चा बिझनेस वाढला .. तिला फिल्ममधे मेकअप करायची संधी मिळाली.. पण मग हिचं काय??
आरशासमोर बसली.. मेकअप रिमुव्हर ने एक एक लेअर उतरवु लागली तसतसा तिचा खरा चेहरा दिसु लागला. तिला रडु आलं… रडुन रडुन तिचं डोकं भणभणायला लागलं पण ना तिथे मेकअप आर्टीस्ट ना सोशल मिडीयावरचे सो कॉल्ड मित्र …तिची लढाई तिला एकटीलाच लढायची होती.. तिचे मेकअपचे फोटो वेगळ्या नावाने ती सोशल मिडीयावर शेअर करु लागली.. अनेक कमेंट्सने ती सुखावली.. त्यातुन अनेक मेसेजेस आले.. तु खुप सुंदर आहेस.. yu r looking beautifull…तिला मनोमन आनंद झाला.. एका मित्राने तिला डिनर ला बोलावले म्हणुन ती मेकअप न करता मुद्दाम गेली आणि त्याने तिला लांबुन पाहिलं आणि अर्जंट घरी जावं लागतय सांगुन निघुन गेला.तिला जे समजायचं ते समजुन गेली.. खरा चेहरा तिच्या लक्षात आला… चार दिवस मेकअप लावुन ती फिरत होती पण लोक तर न दिसणारा मेकअप लावुन फिरतात हेच खरं..
अनेक किस्से सोशल मिडीयावरील फोटो आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती यात घडतात.. जसे आहात तसेच समोर जा.. कारण आपण खरे आणि प्रामाणिक असतो स्वतःशीच..
सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री