*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार श्री जयराम नारायण धोंगडे यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उत्कृष्ट गझलकार कवी पुरस्कार प्रदान*
*व्यक्ती विशेष*
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा “उत्कृष्ट गझलकार कवी” पुरस्कार एका दिमाखदार सोहळ्यात नांदेडचे लोकप्रिय खासदार मान. श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते श्री.सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते रसिकांच्या हाउसफुल साक्षीने नांदेड येथील कवी गझलकार श्री.जयराम नारायण धोंगडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महासंघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष मान.श्री.निखिलभाऊ लातूरकर, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.विजयराव जोशी आणि सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा “उत्कृष्ट गझलकार कवी” पुरस्कार स्वीकारल्यानंतर गझलकार जयराम धोंगडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, *”आनंदाचे डोही आनंद तरंग उमटताना आज प्रत्यक्षात अनुभवले… लेखनाचे चीज झाले… तन मन आनंदुन गेले”.*
विज्ञान शाखेचे गणिताचे पदवीधर असलेले श्री.जयराम धोंगडे हे विश्व इन्स्टिट्यूट ऑफ यूरोलॉजी आणि किडनी सेंटर, नांदेड येथे प्रशासक म्हणून कार्यरत असून व्यंकटेश प्लेसमेंट सेंटरचे संचालक म्हणूनही काम पाहत आहेत. लेखन, काव्य, गझल ही त्यांची आवड असून यापूर्वी त्यांचे *जय बोले….कोरोनायन…. व शब्दाटकी* असे तीन कविता तसेच गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. *मी छंदी मी स्वच्छंदी* हा गझलसंग्रह व *तिपेडी* नावाने काव्यसंग्रह प्रकाशाच्या मार्गावर आहेत. कवी गझलकार जयराम धोंगडे यांना मिळालेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पुरस्कार हा या वर्षातील सलग चौथा पुरस्कार आहे. यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार (मराठी साहित्य मंडळ, ठाणे), राज्यस्तरीय सूर्योदय गजल पुरस्कार (सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, नाशिक), उत्कृष्ट गझलकार पुरस्कार (भावमेघ साहित्य विचार मंच, मुंबई) असे तीन पुरस्कार मिळालेले आहेत. अत्यंत प्रतिभाशाली काव्य आणि गझल लेखन त्यांच्या लिखाणातून दिसून येतं. गझलकार श्री.जयराम धोंगडे यांनी केलेल्या प्रामाणिक साहित्य सेवेचे त्यांना फळ मिळाले असेच म्हणावे लागेल. अनेक दैनिक, मासिक आणि सोशल मीडियावर त्यांच्या कवितासंग्रह तसेच गझल संग्रहाचे विशेष कौतुक झालेले आहे. जय बोले, कोरोनायन आणि शब्दाटकी हे त्यांचे कविता तसेच गझल संग्रह कौतुकास पात्र ठरले आहेत.
गझलकार श्री जयराम धोंगडे यांच्या शब्दात त्यांचे कौतुक करायचे तर…
*धावणाऱ्या हे मना तू थांब ना*
*का असा तू धावतो मज सांगना*
*वेदना झाल्या मुक्या आनंदलो* *सार्थकी बघ लागताहे साधना*
*पाझरावे काळजाने पाहता*
*दैन्य सारे दुःख अन् त्या यातना*
*जीव आहे जो वरी देहात या*
*नित्यनेमाने करो आराधना*
*होत राहो चांगले मज वाटते*
*पोटतिडकीची अशी शुभकामना!*
*गझलकार…जयराम धोंगडे*
संपर्क ९४२२५५३३६९
*वृत्तलेखन….*
*(दीपी)*
*दीपक पटेकर, संवाद मीडिया*