ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाल्या बद्दल ग्रामस्थांनी दादा साईल व प्रसाद पाटकर यांचे आभार मानले..
कुडाळ :
कोरोना कालावधी पासून कुडाळ आगारातून सुटणारी कुडाळ कोरजाई व्हाया कर्ली ही दोन वर्षे बंद असलेली भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तथा पणदूर सरपंच दादा साईल यांच्या एका फोन नंतर तात्काळ सुरू झाली आहे. यासाठी वेंगुर्ल्याचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर यांचाही पाठपुरावा लाभला
याबाबत ग्रामस्थांच्या मागणी नुसार प्रसाद पाटकर यांनी निवेदनाद्वारे कुडाळ आगाराचे लक्ष वेधले होते. परंतु नेहमीप्रमाणे एसटी आगाराकडून थातूर मातूर उत्तरे मिळाली. ही बाब त्यांनी दादा साईल यांच्या कानावर घातली. दादा साईल यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून कुडाळ आगारातून सुटणारी ही गाडी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर तात्काळ आजपासून कुडाळ कोरजाई व्हाया कर्ली गाडी पूर्ववत सुरू झाली. तालुकाध्यक्ष दादा साईल आणि प्रसाद पाटकर यांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाल्या बद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.